श्री स्वामी सिधवासा अपार्टमेंटमध्ये शिवसेनेमार्फत रक्तदान शिबीर संपन्न..
शिवसेनेमार्फत रक्तदान शिबीर संपन्न

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः आपल्या भारत देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाले असल्यामुळे संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने देवद पनवेल येथील श्री स्वामी सिधवासा अपार्टमेंट मधील सोसायटीचे अध्यक्ष   शिवसेनेचे उप विभागप्रमुख जयंत पाखरे, हेमंत म्हात्रे यांनी पुढाकार धेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या निमित्ताने शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर बडे विचूंबे शाखेतील उप विभाग प्रमुख विशाल भोईर, सौ.शारदा पाटील सुकापूर शाखेतील पदाधिकारी केतन केणी, डॉ.बांदेकर, देवद शाखेतील पदाधिकाऱी दिपक दळवी, आनंद चव्हाण, पांडे, चव्हाण काका, सिध्देश चव्हाण, तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी अपोलो हॉस हॉसपीटलचे डॉकटर इतर कर्मचारी उपस्थित होते. 25 रक्तदात्यांनी रक्तदान करून हातभार लावला. या सर्वाना एक एक तुळशीचे रोप देऊन  सोसायटीतील अध्यक्ष जयंत पाखरे, हेमंत म्हात्रे यांनी आभार व्यक्त करून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न केला.फोटो ः शिवसेनेतर्फे रक्तदान शिबीर
Comments