कामोठे उड्डाण पुलावर शिवशाही बस व पीकअप बोलरो जीपला अपघात ; चालक जखमी
कामोठे उड्डाण पुलावर शिवशाही बस व पीकअप बोलरो जीपला अपघात ; चालक जखमी 

पनवेल दि. ०२ ( वार्ताहर ) : सायन पनवेल महामार्गावर आज कामोठे उड्डाणपुलावर शिवशाही बसचा विचित्र अपघात घडला. या अपघातात शिवशाही बस समोरील पीकअप बोलरोला जाऊन आदळली. यावेळी बसमध्ये 14 प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवाशी सुखरूप असून पिकअप बोलोरेमधील चालक मात्र किरकोळ जखमी झाला आहे . 
            
एम एच 04 जे के 5781 या क्रमांकाची शिवशाही बस साताऱ्याहून बोरिवलीला चालली होती. ही बस मुबई-पुणे द्रुतगती महामार्ग संपल्या नंतर कामोठे उड्डाणपुलावर आली. कामोठे उड्डाणपुलावर आल्यानंतर काही सेकंदातच शेजारून चाललेली पिकअप बोलेरो शिवशाही बसच्या समोर आली, ही पिकअप बोलेरो समोर आल्याचे पाहून, अपघात टाळण्यासाठी प्रसंगावधान दाखवत शिवशाही बसच्या चालकाने अर्जंट ब्रेक दाबला, तरीही वेगामुळे बस बोलोरेला जाऊन धडकली, या नंतर शिवशाही बस, उड्डाणपुलावरील रस्त्याकडील संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली आणि  थांबली यामुळे मोठा अनर्थ टळला. 
फोटो - अपघातगस्त वाहने
Comments