पनवेल परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू ; एक जखमी ..
पनवेल परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू ; एक जखमी ..

पनवेल दि . २१ ( संजय कदम ) : पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे . 
              
 पनवेल जवळील जेएनपीटी  ते पळस्पे जाणाऱ्या हायवेवर कुंडेवहाळ परिसरातून आरोपी मयत चालक किरण अण्णा मुळीक ( वय ३५ ) याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर भरधाव वेगाने चालवून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या लाईटच्या पोल ला धडक दिली यात तो गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू पावला आहे . तर त्याचा सहकारी रामबरन यादव वय (२२) हा जखमी झाला आहे  . या  अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . तर दुसऱ्या घटनेत फुडलँड कंपनीच्या बाजूला बस स्टॉप जवळ एका ट्रेलर ने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात जयप्रकाश सिंग यांचा मृत्यू झाला आहे . या घटनेनंतर ट्रेलर चालक प्रसार झाला आहे . या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments