राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कु.मनस्वी जयेश भगत ने पटकाविले सुवर्ण व रौप्यपदक ...

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कु.मनस्वी जयेश भगत ने पटकाविले सुवर्ण व रौप्यपदक ...
पनवेल / वार्ताहर :- 

दिनांक - 5 ऑगस्ट 2022 ते 7 ऑगस्ट 2022 दरम्यान विभागीय  क्रीडा संकुल  स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे पार पडलेल्या 11 मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धे मध्ये पनवेल मधील खेळाडू कुमारी मनस्वी जयेश भगत हिने महाराष्ट्र संघाचे  प्रतिनिधीत्व करताना महाराष्ट्र संघास इपी वैयक्तिक या प्रकारात रौप्यपदक व सांघिक या प्रकारात महाराष्ट्र संघास सुवर्ण पदक मिळवून दिले.
              
या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून 25 राज्यातून जवळपास 500 हुन अधिक स्पर्धा कांनी सहभाग घेतला .या मध्ये पनवेल तालुक्यातील चॅम्पियन्स D'escrime या क्लब मधून 7 खेळाडूंनी सहभाग नोंदविला , या मध्ये  मनस्वी भगत , प्रज्वल गौडा, अर्श सुरवसे , आराध्या वासगडेकर ,श्रेया गडेगावकर, तनया पालसोकर ,पार्थ मेढेकर यांनी दमदार कामगिरी केली. 
 
या विध्यार्थ्यांना मिलिंद ठाकूर , सिद्धार्थ म्हसकर ,प्रशांत भगत यांचे प्रशिक्षण लाभले , तसेच वैभव पेटकर यांनी मार्गदर्शन केले.
Comments