हळदीच्या व्यापाऱ्याची २० लाखांची फसवणूक
हळदीच्या व्यापाऱ्याची २० लाखांची फसवणूक


पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) :   हळद एक्सपोर्ट करण्याच्या बहाण्याने एका ठकसेनाने हळदीच्या व्यापाऱ्याची २० लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तळोजा एमआयडीसी येथील व्यपाऱ्यांकडून २२ लाख ८० हजार रुपये किमतीची २५ टन हळद विकत घेऊन व्यवहारातील फक्त २ लाख रुपये देऊन उर्वरित २० लाख ८० हजार रुपयांचा अपहार करून आरोपीने पलायन केले आहे. 
                      नरेंद्र जैन असे या ठकसेनाचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. मोहम्मद शफिक युसूफ सय्यद (४९) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. केवळ दोन लाख दोन वेळा दिले. तो वेगवेगळी कारणे सांगून पैसे देणे टाळत होता. त्यानंतर त्याने आपला फोन व कार्यालय बंद करून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहम्मद शफिक यांनी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Comments