शिवसेने तर्फे माझा व्यवसाय माझा हक्क योजनेअंतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्धी..
ह्रुदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदूत्व - शिरीष घरत

पनवेल / वार्ताहर : - शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत फिरते विक्री केंद्र योजनेतून बेरोजगारांना स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने माझा व्यवसाय माझा हक्क अशी योजना राबविण्यात आली होती. 
या योजने अंतर्गत आज शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांच्या माध्यमातून खारघर शहरातील या योजनेच्या लाभार्थी सौ. जयश्री प्रशांत जांभूळकर यांच्या नावे नवीन वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला. या फिरत्या स्टॉलचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, उपशहर प्रमुख प्रशांत जांभूळकर, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर ,शाखा प्रमुख संजय कानडे, आनंद व्हावळ, संतोष कट्टीमनी आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Comments