खांदा कॉलनीच्या पाणी कपातीवर शेकापचा सिडको कार्यालया बाहेर धुनी भांडी करण्याच्या इशाऱ्यावर खांदा कॉलनीचा पाणी पुरवठा सुरळीत....
खांदा कॉलनीचा पाणी पुरवठा सुरळीत....
शुक्रवारी दुपारी 2 वाजता रहिवासी महिलांना घेऊन सिडको कार्यालयात शेकापचे आंदोलन

खांदा कॉलनीच्या सुरळीत पाणीपुरवठयासाठी रहिवासी महिला आक्रमक
 
गणेश पाटील,महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांची सिडको कार्यालवर धडक

पनवेल / वार्ताहर : - खांदा कॉलनी मध्ये गेल्या 6 दिवसापासून पाणी कपात व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे तसेच , सिडको पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठ्याचे शटडाऊन च्या नावाखाली खांदा कॉलनी करांवर अन्याय सुरू होता खांदा कॉलनी मधील नागरिकांची गैरसोय गेल्या सहा दिवसापासून होत आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी शेकापच्या पनवेल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, तथा शेकाप नेते, श्री गणेश पाटील, तसेच कामगार नेते तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महापालिका क्षेत्राचे कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी दोन वाजता पाणी पुरवठा विभाग सिडको कार्यालय नविन पनवेल येथे खांदा कॉलनीतील नागरिकांचा घेऊन सिडकोला कार्यालवर धडक दिली, रहिवासी महिला पाणी कपाती वर अतिशय आक्रमक झालेल्या, महिलांनी आज पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर उद्या आम्ही पुन्हा येणार आहोत आणि सिडको कार्यालया बाहेर धुनी भांडी करू असा इशारा महिलांनी दिला
Comments