सीबीडी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायकल रॅली...
सीबीडी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायकल रॅली...
पनवेल वैभव दि. १३ ,(संजय कदम ) : भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण भारतात अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन व जनजागृती करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून सीबीडी पोलीस ठाणे येथे आज दिनांक 13/08/2022 रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर सायकल रॅलीमध्ये सीबीडी पोलीस ठाणे मधील 18 अधिकारी व 50 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला .
                                   सदर सायकल रॅलीस विवेक पानसरे, पोलीस उपयुक्त परिमंडळ 1 वाशी , नवी मुंबई  व गजानन राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुर्भे विभाग यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व रॅलीत सहभाग घेऊन प्रोत्साहन दिले.सदर रॅलीचे आयोजन वपोनि अनिल पाटील यांनी केले होते या रॅलीत देशभक्तीपर गीत , देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.  त्याचप्रमाणे सायकल चालवा व आरोग्य वाचवा असा संदेश देण्यात आला. सदर सायकल रॅली ही सीबीडी पोलीस ठाणे  येथून सुरू करून सेक्टर 4, सेक्टर 5, सेक्टर 8, सेक्टर 1 पोलीस लाईन, पोलीस आयुक्त कार्यालय समोरून सीबीडी रेल्वे स्टेशन सेक्टर 11, व पुन्हा सीबीडी पोलीस ठाणे येथे येऊन ( साधारणता 7 किलोमीटर ) समाप्त करण्यात आली.


फोटो - सीबीडी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायकल रॅली
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image