मराठा उद्योजक सारथीचा भव्य मराठा उद्योजक मेळावा व बिझनेस नेटवर्किंग उपक्रम उत्साहात संपन्न...
मराठा उद्योजक सारथीचा भव्य मराठा उद्योजक मेळावा व बिझनेस नेटवर्किंग उपक्रम उत्साहात संपन्न

पनवेल दि २५ (संजय कदम) : एकत्र आले तर काजवेहि सूर्य वाटू लागतात' या सुविचाराप्रमाणे वेळ आली आहे एकत्र येण्याची हे ब्रीद वाक्य घेऊन मराठा उद्योजक सारथी संस्थेच्या माध्यमातून पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील मराठा उद्योजक बांधवांसाठी, भव्य मराठा उद्योजक मेळावा व बिझनेस नेटवर्किंग उपक्रम नुकताच रोटरी क्लब हॉल, खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाचे रायगड समन्वयक विनोद साबळे, उद्योजक रामदास शेवाळे, व्यावसायिक प्रदीप पाटील, शरद जगताप, अमोल शितोळे, शिवकृपा पतसंस्थेचे अधिकारी देवीदास पवार, माजी नगरसेवक गणेश कडू, मराठा उद्योजक सारथी संस्थेचे संस्थापक सदस्य अनुराज लेकुरवाळे, किरण भोसले, महेश चव्हाण, शिवाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये मराठा बांधवाना मिळणाऱ्या व्यावसायिक कर्ज योजनांबद्दल बँक अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले तसेच महाराष्ट्र शासनाकडून उद्योग / व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या योजना, अनुदान, आर्थिक तरतुदी, कर्ज संबंधित माहितीचे शासकिय अधिकारी मार्फत मौल्यवान मार्गदर्शन करण्यात आले.
Comments