ट्रेलरची दुचाकीला धडक, इसमाचा मृत्यू ...
ट्रेलरची दुचाकीला धडक, इसमाचा मृत्यू 


 पनवेल / वार्ताहर - :  फुडलैंड कंपनीच्या बाजूला बस स्टॉप जवळ ट्रेलरने दूचाकीला धडक दिल्याने यात एका इसमाचा मृत्यू झाला आहे. ट्रेलर चालक अपघात स्थळावरून पळून गेला आहे. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         
एम एच ०६ ए इ ६१३८ घेऊन जयप्रकाश सिंह हे फुडलैंड कंपनीच्या येथून जात होते. यावेळी बस स्टॉप जवळ ट्रेलर क्रमांक एम एस ०४ के यु ८४७० वरील चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या  धडकेत जयप्रकाश सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर न देता ट्रेलर चालक सुरेश कुमार पाल (वय ३४, राहणार प्रयागराज, उत्तरप्रदेश) हा पळून गेला आहे.

Comments