मा.नगरसेवक नितीन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...
मा.नगरसेवक नितीन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...

पनवेल वैभव / प्रतिनिधी : - भाजपा पनवेल शहर मंडल सरचिटणीस तथा माजी नगरसेवक आणि जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष नितीन जयराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज (दि.२९) भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात जाणीव एक सामाजिक संस्थे मार्फत अन्नवाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे व भाजप सोशल मीडिया सेलचे शहर संयोजक प्रसाद हनुमंते, उत्तर रायगड ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद म्हात्रे तसेच पंडित सर, नरेंद्र सोनवणे, सौश्वेता म्हात्रे, सौ स्नेहा पंडित आदी उपस्थित होते यावेळी संस्थेचे ईश्वर ढोरे व सौ करुणा ढोरे यांनी याबाबत आभार मानले.
Comments