नात्यांचे अर्थ प्रगल्भ करणारा नवीन पनवेल मधील श्रीकृष्ण जन्मोत्सव..

नवीन पनवेल मधील श्रीकृष्ण जन्मोत्सव..


पनवेल : नवीन पनवेल येथील तीर्थदर्शन इमारतीचा परीसर रात्री गोपाळ कृष्ण... बाळकृष्ण.... या गजराने दुमदुमून गेला.  निमित्त होते कोरोनाच्या बंधनानंतर मोकळ्या वातावरणात होणा-या सलग २२  वर्षे  सुरू असलेल्या श्री कृष्ण जन्मोत्सवाचे. डामडौल न करता धार्मिक पद्धतीने होणारी दहीहंडी हे या उत्सवाचे एक वैशिष्ट्य होय.

        स्वतःची स्पेस जपण्यासाठी आटापिटा चालू असलेल्या आजच्या गतीमान जीवनशैलीत देखील नात्यांचे अर्थ प्रगल्भ कसे करायचे याचे उदाहरण म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. संतोष तांबोळी व रमेश वायदंडे या  शेजा-यांनी२१ वर्षांपूर्वी गोकुळाष्टमी एकत्र साजरी करण्यास सुरुवात केली. पहाता पहाता परिसरातील नागरिकांचा सहभाग वाढू लागला अन् उत्सव मोठा होऊ लागला. ही उत्सव पालखी श्रद्धेने वाहणारे वायदंडे व तांबोळी कुटुंबीय उत्सवाचा सारा खर्च करतात. यामागे राधा कृष्णाची कृपा असल्याचे दोन्ही कुटुंबे श्रद्धेने सांगतात. श्री कृष्ण सर्वांच्याच पाठीशी उभा आहे. फक्त सकारात्मक वृत्तीतून माणुसकी जपली तर समाजात सौहार्द पूर्ण वातावरण टिकवता येईल हा विचार देणारा हा उत्सव लोकाभिमुख करण्याचा मानस सौरभ तांबोळी यांनी व्यक्त केला.

Comments