सागरी पोलीस ठाणे किनारी सुरक्षा जागरूकता व डेटा संकलन बाबत सागर रक्षक दल सदस्य व मच्छिमार बांधवांनी राबवली मोहिम..
सागर रक्षक दल सदस्य व मच्छिमार बांधवांनी राबवली मोहिम..


पनवेल / दि.०५ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयतर्फे सागरी / खाडी किनारी भागातील गावामधील सागर रक्षक दल सदस्य व मच्छिमार बांधव यांचेकरिता सागरी सुरक्षा संदर्भात जागरूकता आणि डेटा सकंलन करणे तसेच सागरी सुरक्षितेच्या दृष्टीने देवाण-घेवाण करणेकरिता अभियान आयोजित करण्यात आले होते.

भारतीय नौदलाच्या पथकाकडून प्रत्येक जिल्हाच्या अंतर्गत असलेल्या विविध मासेमारी गावांमध्ये सागरी / खाडी किनारी भागातील गावांमध्ये सागरी पोलीस ठाणे किनारी भागात सुरक्षा जागरूकता आणि डेटा संकलन मोहिम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग व पोलीस सह आयुक्त, डॉ. जय जाधव यांचे सुचनेनुसार व विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त श्रीमती रूपाली अंबुरे यांचे मार्गदर्शनाखाली सागरी पोलीस ठाणे किनारी भागात सुरक्षा जागरूकता आणि डेटा संकलन मोहिम उरण सागरी पोलीस ठाणे हद्दीत उरणमधील करंजा मच्छिमार सोसायटी येथे भारतीय नौदलाचे पथकातर्फे मोहीम राबवण्यात आली.
यावेळी मच्छिमार बांधवांनी मासेमारीकरिता खोल समुद्रात मासेमारीकरिता जाताना सतर्क देवाण-घेवाण करणेकरिता व्ही. एच. एफ वायरलेस सेट, मोबाईल फोन सोबत घेवुन जाणे, बोटींमध्ये सुरक्षेकरिता जीव रक्षक साधन सामुग्री जवळ बाळगणे व मासेमारी करिता जे मार्ग देण्यात आलेले आहेत त्याच मार्गाचा वापर करण्यात यावा. तसेच मासेमारी करित असताना नियमितपणे बोटींची मुळ कागदपत्रे व बोटीवर असलेल्या प्रत्येकाकडे फोटो आयडी कार्ड जवळ बाळगणे. समुद्रात कोणत्याही प्रकारची अनोळखी बोट आढळुन आल्यास तात्काळ दुरध्वनी क्रमांक २२७५१०२६/१०२२/१०३१ वर तसेच एम. आर. सी. सी. टोल फ्री क्रं. १५५४, ओएनजीसी हेल्पलाईन १८००२२१९५६ वर संपर्क करणे याबाबत सागरी सुरक्षितेच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दुवन त्यांना सागरी सुरक्षा संदर्भात महत्व पटवून दिले. तसेच यावेळी संशयित वस्तु, नौका व इसम यांची तात्काळ माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास देणाऱ्या मच्छिमार बांधव दिपक म्हात्रे, संतोष कडु, आणि जीवनदास जगन्नाथ कोळी यांचा उत्कृष्ट कामागिरी केलेबाबत भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर डेविड सिंह यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सागरी सुरक्षा शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीकांत धरणे, नवी मुंबई यांनी उपस्थित मच्छिमार बांधव, मासेमारी सोसायटी अध्यक्ष व सागर रक्षक दल सदस्य त्यांच्याशी संवाद साधुन सांगितले की, सागर रक्षक दल / ग्रामरक्षक दल / मच्छिमार बांधव हे सागरी सुरक्षेचे डोळे व कान असुन त्यांनी सागरी सुरक्षेच्या संदर्भात सतर्क राहुन सागरी/खाडी किनारीभागात संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन सदरची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास दिल्यास पुढील योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोईचे होईल. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे सागरी सुरक्षेसंदर्भात सुरू करण्यात आलेल्या कोस्टल हेल्पलाईन क्रमांक १०९३ ची उपस्थितांना माहिती दिली व सदर हेल्पलाईनचा वापर करण्याबाबत आवाहन केले.
सदर अभियानामध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर डेविड सिंह, कोस्ट गार्ड प्रधान अधिकारी पी. एम. सतदेव, ओएनजीसी चे सुरक्षा निरीक्षक अधिकारी स्वनिल ठाकुर व सुनिल कुमार, सागरी सुरक्षा शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, उरण सागरी पोलीस ठाणे, सपोनि विशाल राजवाडे, सागरी सुरक्षा शाखा, नौका विभाग अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ दळवी, बंदर विभागाचे, पोलीस निरीक्षक, देविदास जाधव, करंजा मासेमारी सोसायटी अध्यक्ष भालचंद्र कोळी व सागरी किनारी गावातील ११० सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव व मासेमारी सोसायटीचे अध्यक्ष तसेच विविध कार्यकारी मच्छिमार सहकार सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते.


फोटो :  सागर रक्षक दल सदस्य व मच्छिमार बांधवसाठी सुरक्षा जागरूकता मोहिम
Comments