वाहतुकीचे नियम सांगत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा...
 
क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनचा रक्षाबंधन उत्साहात साजरा...

पनवेल वैभव : प्रतिनिधी : - आज रक्षाबंधन दिनी नवीन पनवेल येथे रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .भावंडांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढवणारा रक्षाबंधन हा पवित्र सण सालाबादप्रमाणे यंदाही क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . 
या दिवशी दरवर्षी प्रमाणे वाहतूक शाखेचे  नियम न पाळणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना थांबवून त्यांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे सांगण्यात येते. 
भाऊ बहिणीची रक्षा करण्याचे वचन रक्षाबंधन दिवशी दिले जाते त्याचप्रमाणे आम्हा फाउंडेशनच्या महिला नियम न पाळणाऱ्या भावांना राखी बांधून त्यांचे रक्षण व्हावे, त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा अशी इच्छा व्यक्त करत हा रक्षाबंधनाचा पवित्र सण सालाबादप्रमाणे क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन सौ रुपालीताई शिंदे यांच्या मार्फत साजरा करण्यात येतो, त्याचबरोबर वाहतूक विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी हे देखील सणाच्या दिवशी सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना देखील आम्ही फाउंडेशनच्या सर्व महिला राखी बांधून त्यांना त्यांच्या बहिणींची कमी पूर्ण करतो. अश्या पद्धतीने हा उपक्रम साजरा करण्यात आला.
वाहतुकीचे नियमाचे पालन करण्यासाठी हा अनोखा कर्यक्रम होत आहे तसेच फाउंडेशन च्या अध्यक्ष सौ  रुपालीताई यांचे वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी हा सण अभिमानास्पद साजरा करत आहात म्हणून कौतुकाची थाप देत भरभरून त्यांचे व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.  याप्रसंगी  वपोनि/संजय नाळे, पोउपनिरी/गणेश खांडेकर, पोउपनिरी/जाधव, पोहवा/सुतार, मपोहवा/अलका पाटील, मपोना/वैशाली कोकाटे, मपोशि/कांचन जाधव, मपोशि/साधना पवार, मपोशि/सुप्रिया देसाई, पोशि/निकम, पोशि/आंधळे  क्रांतीज्योत महिला विकास  फाउंडेशनच्या अध्यक्ष मा. सौ. रुपालिताई शिंदे, उपाध्यक्ष सौ. नंदिनी गुप्ता, विचुंबे अध्यक्ष सौ. रत्नमाला पाबरेकर, करंजाडे अध्यक्ष श्रीमती स्नेहा धुमाळ, आदई अध्यक्ष सौ. कुंदा धनवटे, तसेच महिला  सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments