वाढत्या महागाई व राज्य सरकाराच्या चुकीच्या धोरणा विरोधात काँग्रेस पनवेल शहर तर्फे जाहीर निषेध...


जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा जाहीर निषेध...
पनवेल दि. ०५(संजय कदम): सध्या संपूर्ण देशभरात महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जीवनाश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जी.एस.टी मुळे सामान्य माणूस काय करेल याकडे केंद्र सरकारचा थोडे सुद्धा लक्ष दिसून येत नाही. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी शेती पूर्णत: खरडून गेली आहे, तर कित्येक शेतीमध्ये नदी - नाल्यांचा गाळ साचल्याने ती खराब झाली आहे यामुळे शेतींवर भविष्यात कोणतीही पिके घेता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस  पक्षातर्फे केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आले या वेळी उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थित राहून निवेदन स्वीकारले. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या वर्षाचे पिक कर्ज माफ करावे, फळ बागयतदारांना भरीव मदत द्यावी, खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी ठोस मदत मिळावी. अशी मागणी काँग्रेस  पक्षातर्फे या निवेदनाव्दारे करण्यात आली. 
सदर प्रसंगी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजित पांडुरंग पाटील, जेष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, पनवेल शहर अध्यक्ष लतीफ शेख,  नौफील सय्यद, अमीर सय्यद  विश्वनाथ चौधरी, पूजा मोहन, रेमंड गोवियस, आदम ढलाईत, आदित्य सावळेकर, भारती जळगावकर, संतोष चिखलकर, अरुण ठाकूर, अंकुश गायकवाड, अखिल अधिकारी, नित्यानंद म्हात्रे, सुधीर मोरे, अनुपमा चुढा, नीता शेनोय, डॉ. अमित दवे, आरती ठाकुर, अंजुम तेरवा, इ अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


फोटो :  पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजित पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला निषेध मोर्चा.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image