अभिनव युवक मित्र मंडळाच्या ३२ व्या गणेशोत्सवाच्या मंडपाचे भूमीपूजन..
अभिनव युवक मित्र मंडळाच्या 32 व्या गणेशोत्सवाच्या मंडपाचे भूमीपूजन

पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील सुप्रसिद्ध अशा पायोनिअर विभागातील नवसाला पावणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळाच्या 32 व्या गणेशोत्सवानिमित्त मंडपाच्या कामाचे भूमीपूजन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यामध्ये अभिनव युवक मित्र मंडळ पनवेल सन 2022-23 कार्याध्यक्ष नितीन जयराम पाटील, अध्यक्ष राजा चव्हाण, उपाध्यक्ष अल्पेश पाडावे, खजिनदार शैलेश कदम, सचिव अतिष जोशी, महेश सरदेसाई, संजय कदम, राहुल सावंत, परेश बोरकर, रुपेश नागवेकर, प्रदीप कुंभार, छगन परमार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्रीफळ वाढवून व मंडपाचे पूजन करून बाप्पा मोरयाच्या जयघोषात कामाचा शुभारंभ करण्यात आला.


फोटो ः अभिनव युवक मित्र मंडळाच्या मंडपाचे  भूमीपूजन करताना पदाधिकारी व कार्यकर्ते
Comments