श्री साई नारायण बाबा मंदिरामध्ये विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन सोहळा संपन्न ...
श्री साई नारायण बाबा मंदिरामध्ये विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन सोहळा संपन्न 

पनवेल दि १२,( संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन मार्गावरील श्री साई नारायण बाबा मंदिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता . यात  विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रक्षाबंधनाचा आनंद लुटला . 
                           श्री साई नारायण बाबा मंदिरामध्ये श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले होते   एसएसएनबी प्री -स्कूल ,पनवेलच्या ७५  विद्यार्थ्यांनी  यात सहभाग घेतला होता . ट्रस्ट चे वाईस चेअरमन राम थडानी , सचिव रामलाल चौधरी यांनी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते . 


फोटो - श्री साई नारायण बाबा मंदिरामध्ये विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन सोहळा
Comments