घरकामासाठी आणलेल्या नोकराने दागिने चोरून केला पोबारा...
घरकामासाठी आणलेल्या नोकराने दागिने चोरून केला पोबारा

पनवेल दि.२५ (वार्ताहर) : हेलिकॉप्टर पायलटने त्रिपुरा येथून घरकामासाठी आणलेल्या नोकराने दागिने चोरून पोबारा केल्याची घटना उलवे येथे घडली आहे. याप्रकरणी नोकराविरोधात गुन्हा दाखल केल्याचे उलवे पोलिसांनी सांगितले.
उलवे यथे राहणाऱ्या रवींद्र जैस्वाल यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ते कामानिमित्त त्रिपुरा येथे असताना त्यांनी घरात कामासाठी नोकर पाहिजे असल्याची जाहिरात दिली होती. त्याद्वारे बिकास देबनाथ (२४) याने भेटून नोकरीची तयारी दाखवली होती. त्यावर जैस्वाल त्याला घेऊन उलवे येथील घरी घेऊन आले होते. दरम्यान मागील आठवड्यात ते कामानिमित्त नागपूरला असताना त्यांची पत्नी घरी एकटीच होती. त्यादरम्यान बिकास हा त्याला राहण्यासाठी दिलेले घर बंद करून गेलेला असल्याचे समोर आले; परंतु दोन दिवसांनी जैस्वाल हे पत्नीसह एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या पत्नीने दागिने तपासले असता ते सापडले नाहीत. यावरून बिकास याने दागिन्यांची चोरी करून पळ काढल्याचे समोर आले. चोरी करताना त्याने सीसीटीव्हीदेखील बंद केला होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Comments