१४ ऑगस्ट विभाजन विभिषिका स्मृती दिवस..
१४ ऑगस्ट विभाजन विभिषिका स्मृती दिवस..

पनवेल/ वार्ताहर  : -  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि.१४ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
आपल्याच देशात तेव्हा आपला पाहुण्यासारखा वावर होता. याच दरम्यान सर्वात मोठी इतिहासातील माणसांची वाटणी आपल्याला बघायला मिळते. या दिवसाच्या आठवणीने मानव आपसातील भेदभाव, वैमनस्य, दुराचार, दृष्टावृतीचे विष संपायला मदत करेल अशी अपेक्षा आहे, त्याहून अधिक म्हणजे सामाजिक सद्भावना, एकता ,अखंडित ठेवण्यास नेहमीच प्रेरणा मिळेल.
पण हे सुद्धा खरं आहे की हा दिवस आपण विसरू शकत नाही कारण लाखो परिवार ह्यात नष्ट झाले, पण यातून आपण काही शिकू शकतो ते म्हणजे आपल्या भारतातील अखंडता हीच आपली एकता आहे व यातूनच आपण पुढे सावरलो आणि देशाची प्रगती झाली. १४ऑगस्ट रोजी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने, माजी प्रांतपाल डॉ गिरीष गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम  रोटरीचे प्रांतपाल डॉ अनिल परमार यांची प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील , पुष्पलता पाटील, सेक्रेटरी अनिल ठकेकर व माजी अध्यक्ष ,सर्व सन्मानीय सदस्य सदर कार्यक्रमात उपस्थित होते.  बी पी सी एल पेट्रोल पंप व अमोल ऑटोमोबाईलचे प्रवीण पाटील, अस्मित पाटील व त्यांच्या सर्व स्टाफचे नियोजन करण्यात मोलाचे सहकार्य मिळाले व त्यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image