भाजप कामगार आघाडी बरोबर सलग्न छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेची स्थापना..
भाजप कामगार आघाडी बरोबर सलग्न छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेची स्थापना

नवी मुंबई: भाजपा  कामगार आघाडी प्रणित , छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेना या संघटनेशी सलग्न करण्याचा कार्यक्रम प्रदेश भाजप कार्यालय मुंबई येथे पार पडला.तसेच छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे पाहिले अध्यक्ष म्हणून नवी मुंबई, बेलापूर येथील संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे भाजपा कामगार आघाडीशी सलग्न करताना  म्हाडाचे अध्यक्ष संजय केनेकर ,भाजप कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांच्या हस्ते करण्यात आले.

 या वेळी संलग्नतेचे पत्र कामगार नेते व छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनाचे अध्यक्ष संजय पवार यांनी स्वीकारले त्या वेळी भाजप कामगार आघाडी उपाध्यक्ष अमित कदम , सरचिटणीस प्रमोद जाधव  हनुमंत लांडगे , अभिजित सांगळे , अक्षय कोळी , प्रितेश गोलीम , मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.
Comments