स्त्री शक्ती फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट..
पनवेल दि. ०२ (संजय कदम) : कळंबोली मधील सर्वसामान्य नागरीकांना नेहमीच भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर स्त्री शक्ती फौंडेशन च्या अध्यक्षा सौ विजया कदम यांच्या सह सामाजिक संस्था चे पदाधिकारी यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा करून त्या समस्या प्रामुख्याने मांडल्या तसेच लवकरात लवकर या समस्या सोडविण्याची मागणी केली.
यामध्ये प्रामुख्याने कळंबोलीतील रस्ते व गटारांच्या समस्या, कळंबोली कामोठे जोड रस्ता ते तलावापर्यंतच्या रस्त्याचे विस्तारीकरण, कामोठे बस स्टॉप ला जाण्यासाठी पीडब्लूडी मार्फत ब्रिज खाली रस्त्याचे व्यवस्थित काम व रात्री विद्युत रोषणाई, रस्त्यावर गाड्या पार्किंग या सम व विषम तारखेप्रमाणे करून आवश्यक तिथे पार्किंग झोन, पनवेल महानगरपालिकेतील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात चांगले काम करावे म्हणून आदर्श प्रभाग व आदर्श नगरसेवक निवड, जनता दरबार, मराठा आरक्षण आंदोलनातील निर्दोष व्यक्तींचे गुन्हे रद्द करण्याबाबत, आपात्कालीन व्यवस्थेच्या निर्मिती तसेच यावेळी कळंबोलीतील राम मंदिराची दुरुस्ती करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे साहीत्य लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. याचबरोबर इतर विषयावर सकारात्मकपणे मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी सौ विजया कदम ,सौ शुभांगी निर्मळे, भरत कोरडे, राम मंदिर अध्यक्ष संतोष मोकल, महादेव क्षीरसागर, भिमराज खामकर, पांडूरंग जाधव, गणेश लाड, सुशांत कापरे आदी उपस्थित होते. तसेच या शिष्टमंडळाने आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सुद्धा दिल्या .
फोटो - आ. प्रशांत ठाकूर यांच्या बरोबर स्त्री शक्ती फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा तसेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा . ( छाया संजय कदम )