भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हॉटेल हरिओम कट्टा तर्फे मोफत तिरंगा व्हेज बिर्याणी
पनवेल दि १५, (वार्ताहर ) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरु आहेत अश्याच प्रकारे पनवेल शहरातील उरण रोड एम. एस. ई. बी ऑफिस शेजारी असलेल्या हॉटेल हरी ओम कट्टा तर्फे मोफत तिरंगा व्हेज बिर्याणी चे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ पानवेलकरांनी मोठ्या उत्साहात घेतला.
हॉटेल हरी ओम कट्टाचे प्रो. प्रा. प्रशांत कर्पे यांनी संपूर्ण हॉटेल ची सजावट तिरंग्या मध्ये केली होती. या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन कौतुक केले. यावेळी मा. नगरसेवक अजय बहिरा, मा. नगरसेवक मुकीत काझी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येथे भेट देऊन बिर्याणी चा आस्वाद घेतला. तसेच पत्रकार अनिल कुरघोडे यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त आ. प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांच्या समवेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
फोटो - आ. प्रशांत ठाकूर यांनी दिली हॉटेल हरी ओम कट्टा ला भेट तसेच पत्रकार अनिल कुरघोडे यांना शुभेच्छा.