गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांचे दंगा काबु योजनेची रंगीत तालीम
पनवेल वैभव, दि.25 (संजय कदम) ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने आज तालुक्यातील कोन, सावळा रोड सोमटणे येथे वपोनि रवींद्र दांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम करण्यात आली.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत आगामी गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने कोन सावळा रोड सोमटणे येथे आज दंगा काबू योजना रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित दंगा काबू योजना रंगीत तालीम मध्ये पनवेल तालुका पोलीस ठाणेकडील 02 पोनि, 03 सपोनि, 04 पोउपनिरी, 21 पुरूष/महिला पोलीस अंमलदार हजर होते. त्याचप्रमाणे नवीन पनवेल फायर ब्रिगेडचे 01 अधिकारी 04 कर्मचारी, बिट मार्शल चे पोलीस अंमलदार असे सहभागी झालेले होते.
फोटो ः पनवेल तालुका पोलिसांची दंगा काबु योजना