सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सोनावणे यांची सदिच्छा भेट...
पनवेल वैभव / दि.०१(संजय कदम): भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र महसूल पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष माधव भांडारी यांची सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सोनावणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, एस.आर.एस. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच अयोध्या पुस्तक नियोजित प्रकाशन आणि पनवेल महानगर पालिका निवडणुकी संदर्भात चर्चा केली यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र मुस्लिम संघाचे मुख्य संयोजक ऍड.एफ. एम.ठाकूर व एस. आर. एस. ग्रुपचे व्यवस्थापक गणेश भगत उपस्थित होते.
फोटो: प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांची भेट घेताना डॉ. संजय सोनावणे