भरधाव ट्रेलरची मोटार सायकलला धडक ; 2 जण जखमी...
भरधाव ट्रेलरची मोटार सायकलला धडक ; 
2 जण जखमी...

पनवेल, दि.16 (संजय कदम) ः एका भरधाव ट्रेलरने मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील गव्हाण फाटा बस स्टॉप जुना पनवेल ते उरण मार्गावर घडली आहे.
मोटार सायकलवरुन बादलकुमार शाकेत (25) व त्याचा नातेवाईक रवींद्रकुमार सिंह (30) हे दोघे सदर ठिकाणावरुन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने त्यांच्या गाडीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात हे दोघे जखमी झाल्याने तसेच सदर अपघातानंतर ट्रेलर चालक ट्रेलरसह पळून गेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments