एचपी कंपनीच्या ८ गॅस सिलेंडरची चोरी...
एचपी कंपनीच्या ८ गॅस सिलेंडरची चोरी...

पनवेल दि.२९ (संजय कदम) : ट्रकमध्ये ठेवलेल्या एचपी कंपनीच्या ८ गॅस सिलेंडरची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. 
कृष्णकुमार शिवसहाय सिंह (वय ४५) यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र.एम एच ०४ एएफ २०९९ हा पनवेल बस डेपो येथील मंदिराजवळ उभा करून ठेवला असता अज्ञात चोरट्याने सदर ट्रक मधील एचपी कंपनीचे  ८ गॅस सिलेंडर ज्याची किंमत जवळपास २४०० रुपये इतकी आहे ते चोरीस गेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments