अनोळखी इसमाची गळा आवळून हत्या...
अनोळखी इसमाची गळा आवळून हत्या...

पनवेल दि.३० (वार्ताहर) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी इसमाची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 
     
पनवेल तालुका हद्दीतील मौजे मालडुंगे गाव ते बदलापूर वांगणी कडे जाणाऱ्या पायवाटेच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोहाच्या माळीच्या झाडीत अंदाजे 30 ते 35 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आलेला आहे. या मृतदेहास गळ्याभोवती पांढऱ्या रंगाचा गमचा गुंडाळून त्याचा गळा आवळून जीवे ठार मारण्यात आले व त्यांनतर त्याची ओळख पटू नये याकरिता त्यास जाळून टाकण्याचा प्रयत्न करून त्याचा चेहरा विद्रुप केला आहे. या इसमाच्या अंगात चॉकलेटी रंगाचा जळालेला फुल शर्ट व आतमध्ये लाल रंगाचा सॅंडो बनियान व हाफ गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट व त्यावर इंग्रजीत adibas अशी प्रिंट आहे. हा मृतदेह शव विच्छेदनाकरता पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
फोटो : अज्ञात इसमाचा मृतदेह
Comments