कामावर गेलेला इसम घरी परतलाच नाही ...
कामावर गेलेला इसम घरी परतलाच नाही ..
पनवेल दि २८ ( संजय कदम) : कामावर जातो असे सांगून एक इसम घरा बाहेर पडला तो अद्याप घरी न परतल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
                    नविद मोहसीन अधिकारी (वय ५४) रा. पाडा मोहल्ला पनवेल , रंग गोरा, उंची ५ फूट ६ इंच, बांधा मजबूत, डोक्याचे केस काळे- पांढरे, दाढी कोरलेली असून अंगात क्रीम रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट व पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे.   या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर ०२२२७४५२३३३ किंवा पोहवा संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा. 


फोटो -  नविद मोहसीन अधिकारी
Comments