पनवेल परिसरातील ३ वेग-वेगेळ्या अपघातात १ ठार २ जखमी ...
पनवेल परिसरातील ३ वेग-वेगेळ्या अपघातात १ ठार २ जखमी ...

पनवेल दि.२७  (संजय कदम) : पनवेल परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघात १ ठार २ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 
          
पनवेल जवळील  गव्हाण फाट्याजवळ पप्पूसिह राजपूत वय २४ हा त्याची ऍक्टिव्ह स्कुटी घेऊन जात असताना त्याच्या गाडीला पाठीमागून आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या अपघातात नवीन पनवेल येथूल पायी जात असलेल्या ६४ वर्षीय एका महिलेला पाण्याच्या टँकरची धडक बसल्याने त्यात त्या जखमी झाल्या आहेत. तर तिसऱ्या घटनेत कळंबोली सेक्टर १ इ येथे राहणारे पोपट काटकर यांना मोटार सायकलींची धडक बसल्याने ते जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments