शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पनवेल शहर तर्फे रक्तदान करून साजरा..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पनवेल शहर तर्फे रक्तदान करून साजरा..
पनवेल वैभव वृत्तसेवा  : -  शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर शाखेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शिवसैनिकांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. 

याप्रसंगी शिवसेनेच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले, तसेच अलीकडील उद्धभवलेल्या परिस्थितीत सर्व शिवसैनिक एकजुटीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे असल्याचे दाखवून दिले. यावेळी एकंदरीत बहात्तर (७२) शिवसैनिकांनी रक्तदान करून योगदान दिले.

यावेळी सदर कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील ,भरत पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम   महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपमहानगर संघटक सुनीत ठक्कर, अच्युत मनोरे, पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव, खारघर शहरप्रमुख गुरुनाथ पाटील, शशिकांत डोंगरे, उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, राहुल गोगटे, सुजन मुसलोंडकर, राहुल टेमघरे, अनिल कुरघोडे, अमर पटवर्धन, संकेत बुटाला, राकेश टेमघरे, राजेंद्र भगत, यतीन मानकामे, कुणाल कुरघोडे, माजी नगरसेवक विश्वास म्हात्रे, महिला आघाडी संघटिका अर्चना कुळकर्णी, सुनंदा पाटील, उज्वला गावडे, विभाग प्रमुख अमित माळी, प्रदीप माखेजा, चंद्रकांत शिर्के, शाखाप्रमुख शुभम शेखर माळी, भास्कर पाटील, संतोष तळेकर, उपशाखा प्रमुख राकेश भगत, तसेच विजय शिंदे, प्रविण धोत्रे, तुलसीदास चिखलेकर, दत्तात्रय फडके,अरुण ठाकूर, युवासेना निखिल भगत, विराज साळवी, अमेय ठाकरे, प्रथम ठाकरे, जेष्ठ शिवसैनिक वसंत मांडवकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image