कर्नाळा पक्षी अभयारण्यात ट्रेकर्स चा दुर्देवी मृत्यू ..
कर्नाळा पक्षी अभयारण्यात ट्रेकर्स चा दुर्देवी मृत्यू 

पनवेल दि. १९ (वार्ताहर  ) :पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात ट्रेकिंगसाठी आलेल्या एका ग्रुप मधील 38 वर्षीय ट्रेकर्स चा मृत्यू झल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडल्याचे उघड झाले आहे. ट्रेकिंग दरम्यान हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 38 वर्षीय ट्रेकर्स पुण्यातील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. ट्रेकर्सच्या या मृत्यूमुळे ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुप मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
            शनिवार आणि रविवारची सुट्टी गाठून पुण्यातील ट्रेनेटी एडवेंचर ग्रुप पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयराण्यात ट्रेकिंगसाठी जवळपास या ग्रुप मधील 28 ट्रेकर्स ट्रेकिंग साठी आले होते.आला होता. हे सर्व ट्रेकर्स पुण्यातील रहिवाशी आहेत. कर्नाळा अभयारण्यात पोचल्या नंतर या ट्रेकर्सने, ट्रेकर्स ग्रुप चे प्रमुख  रवींद्र जाळीहाल  यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेकिंग ला सुरवात केली. मात्र या ट्रेकिंग दरम्यान आपल्या ग्रुप एका अपघाताला सामोरे जावे लागेल असे कोणाच्या मनात देखील न्हवते. कारण या ग्रुप मधील 28 सदस्य हे उत्तम ट्रेकर्स होते . तसेच ट्रेकिंग साठी नियमित जात होते. मात्र रविवारी सकाळी या ग्रुप मधील 38 वर्षीय कौस्तुभ देशपांडे यांचा ट्रेकिंग  दरम्यान मृत्यू झाला, ट्रेकिंग करत असताना सुरेद्र च्या छातीत दुखु  लागले आणि त्या नंतर हृदयविकाराचा झटका आला आणि  मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलिस  ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments