महाविद्यालयीन तरुणांच्या स्टंटबाजीने नागरिक हैराण , कारवाई करण्याची नागरिकांची मागणी..
कारवाई करण्याची नागरिकांची मागणी..
पनवेल दि.१६ (वार्ताहर) : मोकळे रस्ते आणि वाहतूक पोलीस नसल्याचा फायदा घेत पनवेल परिसरात बाईकस्वार महाविद्यालयीन तरुणांनी स्टंटबाजी करून नागरिकांना सध्या हैराण केले आहे. मिळेल त्या रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी स्टंटबाजीमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या स्टंटबाजीमध्ये वाहनचालकांना लगाम घालायचा कसा, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे. वाहनांना मॉडिफाय करताना सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

पनवेल परिसरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी, जेएनपीटी मार्ग, खारघर परिसर, वडाळे तलाव जॉगिंग टॅक परिसर, मानससरोवर स्टेशन परिसर, खान्देश्वर स्टेशन परिसर तसेच मोकळ्या मैदानात व रस्त्यावर सध्या बाईकस्वारांनी धूमशान घातले आहे. विशेषतः महाविद्यालयीन तरुणांनी या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करत स्टंटबाजीचे प्रकार सुरू केले आहे. वाहतूक पोलिसांच्या वेळोवेळी होत असलेल्या कारवायांना हि तरुण पिढी घाबरत नसल्याने अश्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
Comments