वॉचमनचा खून करून दीड लाखाचा भंगार माल चोरणाऱ्यांना पोलिसांनी केले गजाआड; मानपाडा पोलिसांनी गाठला सुतावरून स्वर्ग
मानपाडा पोलिसांनी गाठला सुतावरून स्वर्ग..  

पनवेल दि.१६ (संजय कदम) : वॉचमनचा खून करून दीड लाखाचा भंगार माल चोरणाऱ्यांना आरोपींना मानपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासात गजाआड केल्याने मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.  
मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीतील एम.आय.डी.सी. फेज १, डोंबिवली पुर्व येथील विजय पेपर प्रॉडक्ट मिल या कंपनीत एका वॉचमनला जीवे ठार मारल्याची घटना दिनांक १५/०६/ २०२२ रोजी घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वपोनिरी. शेखर बागडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तात्काळ पोलीस पथकास घटनास्थळी रवाना केले. विजय पेपर प्रॉडक्ट मिल या कंपनीत वॉचमन म्हणुन काम करणारा ग्यानबहादुर भिमबहादुर गुरुम, वय ६४ वर्षे रा. खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व हा रात्रौपाळीमध्ये वॉचमनची ड्युटी करीत असताना काही अनोळखी इसमांनी कंपनीतील भंगार माल चोरी करण्याचे उद्देशाने कंपनीच्या भिंतीवरुन कंपनीत प्रवेश करुन वॉचमन ग्याबहादुर यास कोणत्यातरी टणक हत्याराने त्याचे डोक्यावर, डोळयावर, कानाचे वरील भागावार मारहाण करुन त्यास जीवे ठार मारून कंपनीचे ऑफिसमध्ये ठेवलेले १,५०,५०० / - रुचे भंगाराचा माल चोरी करुन नेलेबाबत श्री. जसवंतसिंग रणबहादुर ठाकुर रा. खंबाळपाडा, डोंबिवली पुर्व याने दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पो.स्टे. गुरनं ४६३ / २०२२ भादविक ४६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन, गुन्हयाचा तपास चालु केला.
मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनि शेखर बागडे यांनी मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ वेगवेगळी पथके तयार करून सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेसाठी योग्य त्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सदर पथकांनी परीसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात सदर कंपनीत ०३ इसम प्रवेश करीत असल्याचे तसेच ते भंगार चोरी केल्यानंतर एका ऑटो रिक्षातुन जात असल्याचे आढळुन आले, सदर ऑटो रिक्षाचे मागे एबीपी माझा परीवाराकडुन एबीपी वेडींग नावाचा बॅनर लावलेला होता, त्याप्रमाणे कल्याण व डोंबिवली परीसरातील सर्व ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यात एका ऑटो रिक्षावर लागलेला सदरचा बॅनर कापलेला असल्याचे तपास पथकास आढळुन आले. सदर रिक्षाचा त्यांनी पाठलाग करुन ती रिक्षा अडवली असता त्याचा ड्रायव्हर पोलीसांना पाहुन पळुन जावु लागला त्यास तपास पथकाचे अंमलदारांनी पकडले. त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे नांव टोनी थॉमस डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम रा. सुचकनाका, कल्याण पुर्व असे सांगुन सदरचा गुन्हा हा त्याचे दोन साथीदारांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली. त्याने त्याचे दोन साथीदारासह दिनांक १५/०६/२०२२ रोजी रात्रौ ०२:०० वा. चे सुमारास ऑटो रिक्षा क्र एम.एच ०५ डीक्यु ६९३२ मधुन सदर कंपनीचे जवळ आले. त्यानंतर त्यांनी कंपनीचे भिंतीवरुन उडी मारुन कंपनीत प्रवेश करुन, कंपनीचा माल चोरी करण्यासाठी कंपनीचे ऑफिसचा दरवाजा तोडत असताना, वॉचमन ग्यानबहादुर यास जाग आल्याने त्याने आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यावेळी आरोपीत यांनी त्यास तेथेच पडलेल्या एका रॉडने वॉचमन ग्यानबहादुर याचे डोक्यात रॉड मारुन त्यास जीवे ठार मारुन, त्याचे खिशात असलेली चावी घेवुन त्या चावीने ऑफिसचा दरवाजा उघडुन त्यात ठेवलेले १,५०,००० / - रु किमतीचा कासा, तांबे, पितळी वॉल व इतर भंगाराचे तुकडे असा सुमारे ४०० कि.ग्रॅम वजनाचा माल तसेच वॉचमनचे खिशात असलेला मोबाईल असे चोरी करुन तेथुन निघुन गेले. त्यानंतर त्यांनी सकाळी सदरचा माल कोळशेवाडी येथील भंगारवाला फिरोज इस्माईल खान यास १०,००० / - रु ना विक्री करून मिळालेले पैसे तिनही आरोपींनी आपसांत वाटुन घेतले असल्याची माहिती दिली. नमुद गुन्हयात आरोपी नामे टोनी थॉमस डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम, वय ३० वर्षे, रा. सुचकनाका, कल्याण पुर्व व फिरोज इस्माईल खान, वय ३० रा. कोळशेवाडी, कल्याण पुर्व यास अटक करण्यात आलेली असुन त्याचेकडुन गुन्हयात वापरलेली ऑटो रिक्षा क्र एम. एच ०५ डीक्यु ६९३२ व चोरीस नेलेले सर्व भंगार जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयात आरोपींबाबत कोणतीही माहिती नसतानाही केवळ एबीपी माझा परीवाराकडुन एबीपी वेडींग नावाचा बॅनर ऑटो रिक्षावर लावलेला असल्याचे आढळुन आल्याने त्याआधारे मानपाडा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रयत्न करुन सदरचा गुन्हा 92 तासाचे आंत उघडकीस आणलेला आहे.

सदरचा गुन्हा हा दत्तात्रय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण, सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडे, पोनिरी. बाळासाहेब पवार, पोनिरी अनिल पडवळ, सपोनि अविनाश वनवे, सपोनि अनिल भिसे, सपोनि सुरेश डांबरे, सपोनि सुनिल तारमळे, पोहवा राजेंद्र खिलारे, पोहवा विजय कोळी, पोहवा भानुदास काटकर, पोहवा सोमनाथ टिकेकर, पोहवा सुधीर कदम, पोहवा सुशिल हांडे, पोहवा संतोष चौधरी, पोना शांताराम कसबे, पोना संजु मासाळ, पोना प्रविण किनरे, पोना देवा पवार, पोना यलप्पा पाटील, पोना दिपक गडगे, पोशि महेंद्र मंजा, पोशि अशोक आहेर, पोशि सोपान काकड, 'पोशि विनोद ढाकणे, पोना मंदार यादव, पोना प्रशांत वानखेडे, पोना अशोक कोकोडे, पोना सुशांत तांबे, पोशि तारांचद सोनवने, पोशि संतोष वायकर, पोशि रत्नदिप चौधरी यांचे पथकाने उघडकीस आणलेला आहे.
फोटो : वॉचमनचा खून करून दीड लाखाचा भंगार माल चोरणाऱ्यांना पोलिसांनी केले गजाआड
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image