स्मशानभूमीतील निवारा शेड आठ दिवसात जमीनदोस्त करण्याची शिवसेनेची मागणी..

कळंबोली रोडपाली मधील मध्यवर्ती ठिकाणची महत्त्वाची स्मशानभूमी
शिवसेना स्वखर्चाने पाडणार निवारा शेड

पनवेल / प्रतिनिधी: 
कळंबोली वसाहती मधील विसर्जन तलावाजवळील रोडपाली व कळंबोली येथील स्मशानभूमी चे निवारा शेड जीर्ण झाले आहे.ते पाडण्याची मागणी शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महापालिकेकडे केली आहे.

सिडकोने सुरूवातीला कळंबोली येथील सेक्टर 12 या ठिकाणी  स्मशानभूमी उभारली आहे. त्या ठिकाणी शोकसभा, प्रार्थना तसेच विधी करण्याकरीता निवारा बांधण्यात आला होता. त्याच्या डागडुजीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता या ठिकाणचा स्लॅब कधी कोसळेल याची शाश्वती देता येत नाही. त्याला लोखंडी खाबांचा टेकू देण्यात आला असून ते टेकू ही गंजलेले आहेत. त्याचबरोबर भिंतीला मोठमोठे तडे गेले आहेत त्यामुळे ही वास्तु धोकादायक असल्याची स्थिती आहे.  कामगारांना बसण्यासाठी जो निवारा आहे त्याचीही दुरावस्था झालेली आहे. पावसाळयात तर त्याला गळती लागते त्यामुळे स्मशानात काम करणाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. अशाप्रकारे धोकादायक झालेले  बांधकाम कधीही कोसळू शकते. तसेच या ठिकाणी लाईट ची व्यवस्था ही नाही त्यामुळे रात्रीच्या अंधारात  मृतांच्या नातेवाईकांचा जीव एक प्रकारे धोक्यात सापडला आहे. या ठिकाणी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. असे असताना सिडको नंतर पनवेल महानगर पालिकेचेही  दुर्लक्ष झाले आहे. एखादी घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी अगोदरच याबाबत पावले उचलण्याची गरज आहे. जर पनवेल महानगर पालिकेने जीर्ण झालेला तसेच मोडकळीस आलेला हा निवारा आठ दिवसात जमीनदोस्त केला नाही तर शिवसेना स्वखर्चाने धोकादायक झालेले हे बांधकाम काढून टाकेल, असा इशारा शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी महापालिकेला दिला आहे. जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवितहानी होणार नाही. 
 
याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास शिवसेना आपल्या पध्दतीने हे बांधकाम जमीनदोस्त करेल. रामदास शेवाळे यांनी शिवसैनिकासह स्मशान भूमीची पहाणी केली. यावेळी  कळंबोली शहर प्रमुख डी.एन.मिश्रा,  तुकाराम सरक, सूर्यकांत म्हसकर, श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, रोहन शिरसाट, रणजित फडतरे, नितिन गुलदगड अदी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image