पनवेल / अनिल कुरघोडे : -
दुधे विटेवरी, सेक्टर १ करंजाडे येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत नामोच्चाराच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी विधी सोहळा, होमहवन, मंदिराचे कलश पूजन, विठ्ठल रुख्मिणी मूर्तीची स्थापना विधिवत पूजा अर्चा तसेच महाआरती करून करून करण्यात आली.
या धार्मिक विधीसाठी उद्योजक तुकाराम शेठ उकर्डा दुधे, सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे, उद्योजक एकनाथ शेठ दुधे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पंढरपूरचे महेश साठे, राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्य जळगावचे रवींद्र पाटील,
सरचिटणीस अतुल चव्हाण, नगरसेवक शंकर म्हात्रे, माजी सभापती कृष्णाशेठ पारंगे, माजी जि.प. सदस्य सुभाषशेठ म्हात्रे,उद्योजक ज्ञानदेव दुधे, नंदिनी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती ठक्कर, प्रदीप ठाकरे, आदीसह मोठ्या प्रमाणात परिसरातील भक्तगण या धार्मिक सोहळ्यास उपस्थित होते.
या निमित्ताने विठ्ठल रुख्मिणी हरिपाठ मंडळ कामोठे सेक्टर ९ हरिपाठ साथ ह.भ.प शंकर म्हात्रे, कामोठे व ह.भ.प महादेव महाराज मांडे यांचे सुश्राव्य भजन आयोजित करण्यात आले होते त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी बोलताना उद्योजक तुकाराम शेठ दुधे यांनी सांगितले की ही जागा पंढरीच्या भक्ताची आहे, त्याच्याकडून ही जागा घेतल्यानंतर तिथे विठ्ठल रुख्मिणी मंदिराची स्थापना करावयाची असे मी ठरविले होते ते स्वप्न आज पूर्णत्वास आले. पंचक्रोशीतील लोकांनी याचा लाभ घ्यावा तसेच नागरिकांना सुद्धा एकादशीच्या वेळी प्रत्यक्ष पंढरपूर येथे जरी जाता आले नाही तरी त्यांना येथे दर्शन घेतल्याने पंढरपूच्या विठोबाचे दर्शन घेतल्याचा आनंद निश्चित मिळेल.