पनवेलकर " मजनू " चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद देतील - अभिनेत्री श्वेतलाना अहिरे ..
पनवेलकर " मजनू " चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद देतील  -  अभिनेत्री श्वेतलाना अहिरे 

पनवेल दि १०, ( संजय कदम ) : पनवेलकरांनी आज 'मजनू' चित्रपटाला केलेली आज गर्दी पाहून हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास वाटत असल्याचे प्रतिपादन मजनू चित्रपटाच्या अभिनेत्री श्वेतलाना अहिरे हिने पनवेल शहरातील ओरायन मॉल येथील पीव्हीआर याठिकाणी चित्रपट प्रदर्शनच्यावेळी मत व्यक्त केले.

 यावेळी अभिनेत्री  श्वेतलाना अहिरे हिच्यासह या चित्रपटाचे सहनिर्माते इरफान भोपाली व मान्यवर उपस्थित होते. आज हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मला मोठी उत्सुकता लागली असून, या पूर्वी मी या ठिकाणी इतर अभिनेत्यांचे चित्रपट पाहण्यासाठी येत असे. पण आज माझा स्वतःचा चित्रपट प्रदर्शित होऊन तो प्रत्यक्ष पडद्यावर बघण्याचा एक वेगळाच आनंद मला मिळणार आहे. यासाठी माझे कुटुंबीय सुद्धा येथे उपस्थित आहे. असे मत अभिनेत्री  श्वेतलाना अहिरे  हिने व्यक्त केले तर  या चित्रपटाचे सहनिर्माते इरफान भोपाली यांनी सांगितले कि एक वेगळा धाटणीचा हा चित्रपट असून, हा सर्व मराठी चित्रपटाचा रेकॉर्ड तोडेल अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाची गाणी गुण गुणायला लावणारी आहेत. त्यामुळे पनवेल करांनी हा चित्रपट हाऊसफुल केलाय संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने अल्पावधीतच हा चित्रपट यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


फोटो: मजनू चित्रपटाच्या अभिनेत्री श्वेतलाना अहिरे, सहनिर्माते इरफान भोपाली यांच्यासह मान्यवर.
Comments