फिर्यादीचा विश्वास संपादन करून ट्रकचा अपहार करणाऱ्या टोळीला पनवेल तालुका पोलीसांनी केले जेरबंद..
 पनवेल तालुका पोलीसांनी केले जेरबंद..

पनवेल दि ०७ (संजय कदम): विश्वास संपादन करून ट्रक चा अपहार करणाऱ्या एका टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी जेरबंद केल्याने सहा मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यशस्वी झाले आहेत.

 विनोद रामराव पवार यांनी ट्रकचे मुळ मालक सुधाकर गायकवाड यांचेकडुन करारनामा करून विकत घेतलेला टाटा कंपनीची ट्रक ( बल्कर ) MH13AX4109 हा एच . पी . पेट्रोलपंपाच्या बाजुला पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजिवली , ता . पनवेल , जि . रायगड या ठिकाणी पार्क करून ठेवलेला असताना ट्रक वरील चालक नामे अजिम सलीम पठाण अजिम सामीलखाँ पठाण, रा . रहेमतपुर, जि.सातारा याने त्यांचे समतीशिवाय लबाडीच्या इराद्याने सदरचा ट्रक चोरी करून नेला अशा आशयाची फिर्याद प्राप्त झाल्याने पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रस्तुत गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील आरोपी नामे अजिम सलीम पठाण अजिम सामीलखाँ पठाण, मु.रेहमतपुर, ता.कोरेगाव जि. सातारा. यास तांत्रिक तपासाचे आधारे खारघर येथून अटक करण्यात आली. सदर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने सदरचा ट्रक हा लोकेश एस. सांजिवैय्या वय ३५, धंदा गाडया खरेदी विकी करणे, राह . घर नं . ७२ , बटवाडी , बी.एच.रोड मु.पो.जि. राज्य कर्नाटक व  झाकीर हुसेन मोहम्मद साब परदेवाले वय ४५ वर्षे , गाडया खरेदी विक्री करणे , राह . कुस्तगी चाळ , एस.एस. कॉलेज जवळ , गांधीनगर , मु . पो . बेटगेरी , जि . गदक , राज्य कर्नाटक , यांना विक्री केल्याचे सांगितले . सदर आरोपीना बेंगलोर व कर्नाटक येथून अटक करण्यात आली . अटक आरोपीकडे सदर गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी करता त्याने प्रस्तुत गुन्हयात चोरी केलेला ट्रक हा कोटा, राजस्थान येथे विक्री केल्याचे सांगितले. सदर चोरी झालेला २०,००,००० / - रु . किं . चा टाटा कंपनीचा १४ चाकी ट्रक (वलकर) MH13 / AX / 4109 , भिलवाडा , राजस्थान येथुन हस्तगत करण्यात आलेला आहे . तपासा दरम्यान यातील फिर्यादी यांनी ट्रकचे मुळ मालक सुधाकर गायकवाड यांची परवानगी न घेता तसेच व्यवहार पुर्ण न करता प्रादेशिक परिवहन विभागाचे पुर्व परवानगीशिवाय पासिंग असलेला बल्कर काढुन तो परस्पर विकला व त्यावर चौकोनी बॉडीलावून सदरचा ट्रक त्याच्याकडे काम करीत असलेल्या चालकाने चोरी केल्याचा बनाव करून स्वतःच्या फायद्या करीत ट्रक परस्पर विकून पोलीसात खोटी फिर्याद दिल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे व त्याच्या कडून विविध ठिकाणचे सहा गुन्हे उघडकीस आण्यात आले आहेत. सदर तपास पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ चे शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर, पोनी अंकुश खेडकर, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक अविनाश पाळंदे, सहा पोलीस निरीक्षक संजय गळवे, सपोउनि मनोहर चव्हाण, पोहवा विकास साळवी, पोहवा मंगेश  भूमकर, वैभव शिंदे, पोना राकेश मोकल, पोशी भीमराव खताळ, तुकाराम भोये, पोना जयदीप पवार, पोना पंकज चांदीले, प्रकाश मेहेर, सुनिल कुदळे या पथकाने केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

फोटो : ट्रक चोरी बाबात महिती देताना पोलीस अधिकारी
Comments