संतोष चौधरी राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित...
संतोष चौधरी राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित...
पनवेल दि, २२ ( वार्ताहर) : संतोष शंकर चौधरी यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराने संतोष चौधरी (कळंबोली) तालुका पनवेल यांचा (भोसरी) पुणे येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड, शिक्षक आमदार  विक्रम काळे (मराठवाडा विभाग), पदवीधर आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आजवर केलेले कार्य व विविध उपक्रमांची दखल घेण्यात आली. यावेळी त्यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर बाळाराम पाटील (शिक्षक आमदार कोकण विभाग) यांच्यातर्फे ही मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

फोटो -संतोष चौधरी राज्यस्तरीय सेवा सन्मान
Comments