सांगीतिक श्रद्धांजलीने अत्रे कट्ट्याचा वर्धापन दिन साजरा..

सांगीतिक श्रद्धांजलीने अत्रे कट्ट्याचा वर्धापन दिन साजरा..


पनवेल /वार्ताहर -  : नवीन पनवेल येथील आचार्य अत्रे कट्ट्याने आपला वर्धापन दिन दिग्गज गायकांना सांगीतिक श्रद्धांजली वाहून अनोख्या प्रकारे साजरा केला. सदर कार्यक्रम कर्नाटक संघ हॉलसेक्टर २ नवीन पनवेल येथे झाला.

         कै. रामदास कामत, कै. कीर्ती शिलेदारकै. राजन मिश्रा व भारतरत्न कै. लतादीदी यांचे गायन मनाला मोहवणारं होतं. या दिग्गज कलावंतांच्या जाण्याने पोकळी तयार झाली असली तरी ख-या अर्थाने रसिकांच्या मनात हे दिग्गज कलाकार कायमचे ठाण मांडून आहेत याची जाणीव सदर कार्यक्रमाने करून दिली. आकाशवाणीच्या कल्याणमधील कलाकारांनी हा सांगीतिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम सादर केला. मंगेश लटकेप्रतिक फणसेज्योती खरे यादवार यांनी गीते सादर केली. त्यांना तबल्यावर स्नेहल धामापूरकरव्हायोलीन वर रवी सिधये तर संवादिनी वर जयंत फडके यांनी साथ दिली. पूर्वा कर्वे यांनी सूत्रसंचालन केले. या कलाकारांनी सादर केलेल्या संगीत रस सुरसतिन्हीसांजा सखे निघाल्यादेवा घरचे ज्ञात कुणालाश्रावणात घननीळाशतजन्म शोधिताना,  यती मन ममप्रथम तुज पाहतापावना वामनाकशासाठी येऊ देवाहसले मनी चांदणेगुंतता हृदय हे , धन्य भाग सेवाका अवसर पाया  अशा एकाहून एक सरस गाण्यांनी  रसिक भारावून गेले.

        लेखकाने लिहिलेल्या गाण्यांचा मतितार्थ काय आहेमाझा स्वर कसा लागतोयमाझे साथीदार माझ्या बरोबर येत आहेत की नाही या गोष्टींचा विचार करून गाणं सादर केल्यास गायकाचे सादरीकरण प्रभावी होते हे मत मंगेश लटके यांनी व्यक्त केलं. वैशाली केतकर यांनी वर्धापन दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image