विवाहिता बेपत्ता...
विवाहिता बेपत्ता
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात  आली आहे.
सौ.संजीवनी भारत कांबळे (32) रा.करंजाडे, रंग सावळा, उंची 5 फुट, बांधा सडपातळ, चेहरा गोल, नाक सरळ असून कानात पिवळ्या धातूच्या रिंगा, पायात जोडवे व पैंजण तसेच रंगीबेरंगी साडी परिधान केलेली आहे. तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.हवा.यशवंत भोसले यांच्याशी संपर्क साधावा.


फोटो ः संजीवनी कांबळे
Comments