युवासेनेच्या पाठपुराव्यास यश; पनवेल परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण
पनवेल दि.२९ (संजय कदम)- पनवेल महानगर पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी वाड्यांमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणा-या आदीवासी नागरिकांना भेडसावत असलेल्या प्राथमिक सोयी सुविधांच्या समस्यांबाबत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत व सहकारी यांनी निवेदन दिले होते.
त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन विजजोडणी करुण एक वर्षापासुन बंद असलेले स्ट्रीटलाईट चालु करण्याचे काम आज पुर्ण झाले आहे. तसेच मागील आठ महीन्यांपासुन बंद असलेला पाणी पुरवठा करणारे मोटर व लाईट मीटर दुरुस्त करुन आज पाणी पुरवठा चालु करण्यात आला आहे. यावेळी युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत , शिवसेना पनवेल उपजिल्हा संघटक परेश पाटील , पनवेल तालुकाप्रमुख उरण रघुनाथ पाटील , खारघर विभाग संघटक रामचंद्र देवरे , बारवई सरपंच निलेशजी बाबरे, युवासेना खारघर शहर मिथुन पाटील , तसेच वाडीतील ग्रामस्थ गुरुनाथ सपरे , भगवान सपरे, बाबु नाईक , जयराम सपरे , रमेश पारधी , शनिवार सपरे, यशवंत पारधी आदी ग्रामस्थ व महीला मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी या कामांचा श्रीफळ व हार वाढवुन नागरीकांसाठी लोकार्पण करण्यात आले.