रेल्वेच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू..
रेल्वेच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू

पनवेल दि.०७ (वार्ताहर) : पनवेल बेलापूर ते पनवेल रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे लाईन क्रॉस करताना रेल्वेची धडक लागून एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिलेबाबत कोणतीही माहिती नसल्याने पोलीस या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. २५ एप्रिल रोजी ही वृद्ध महिला रेल्वे लाईन क्रॉस करीत असताना बेलापूर ते पनवेल दरम्यान तिला रेल्वेची धडक लागून ती जखमी झाली. तिला उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. या महिलेची उंची अंदाजे ४ फूट ८ इंच, अंगाने सडपातळ, डाव्या हातावर अस्पष्ट गोंदलेले व अंगात मळकट सफेद हाफ शर्ट व फिक्कट भगवी लुंगी परिधान केली आहे. या महिलेबाबत अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Comments