बारबालेला ठार मारण्याचा प्रयत्न ; अज्ञाताचा शोध..
बारबालेला ठार मारण्याचा प्रयत्न ; अज्ञाताचा शोध..


पनवेल दि.२९ (वार्ताहर) : उलवे मध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय बारबालेच्या घरामध्ये घुसलेल्या अज्ञात व्यक्तीने तिचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. बेशुध्दावस्थेत असलेल्या या बारबालेवर नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
                      सदर घटनेतील जखमी तरुणी बारमध्ये काम करणारी असून पूर्वी ती मीरारोड येथे राहण्यास होती. सदर तरुणी कोपरखैरणेतील बेला बारमध्ये कामाला असताना, तिची ओळख कळंबोली येथे राहणाऱ्या हॉटेल व्यावसायिक तरुणासोबत होऊन त्याच्यासोबत तिची चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये संपर्क वाढल्यानंतर हॉटेल व्यावसायिकाने या तरुणीला राहण्यासाठी उलवे, सेक्टर- १९ मधील इमारतीत भाड्याने घर घेऊन दिले होते. या दोघांनी उलवे येथील घरामध्ये जेवण केल्यानंतर रात्री ९ च्या सुमारास हॉटेल व्यावसायिक कळंबोली येथे आपल्या घरी निघून गेला.त्यानंतर मध्यरात्री २ च्या सुमारास हॉटेल व्यावसायिक तरुणाने सदर तरुणीला फोन केला असता, तिने फोन उलचला नाही. त्यानंतर दिवसभर त्याने तीन-चार वेळा तरुणीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने फोन न उचलल्याने सायंकाळी ७ च्या सुमारास हॉटेल व्यावसायिक आपल्या दोन मित्रांसह उलवे येथे गेला. यावेळी त्याने आपल्याकडील चावीने दरवाजा उघडला असता, आतमध्ये तरुणी जखमी आणि बेशुध्दावस्थेत पडल्याचे निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी तिला तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये दाखल केले.दरम्यान, सदर तरुणी अद्याप बेशुध्दावस्थेत असल्याने तिला कुणी मारण्याचा प्रयत्न केला ते समजू शकले नाही. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image