कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांची गणनेला सुरुवात ; कोविड काळानंतर प्रथमच गणना..
कोविड काळानंतर प्रथमच गणना


पनवेल दि 18 (वार्ताहर) :  वन्यजीव विभागामार्फत प्राणी आणि पक्षांची गणना होत असते.  कर्नाळा अभयारण्यात देखील एका संस्थेच्या मदतीने या पक्षी आणि प्राण्यांच्या गणनेला सुरुवात केली गेली. 
नवी मुंबई, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे राहत आहे, त्यामुळे पनवेलपासून अवघ्या काही कि.मी. अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. लाखो पर्यटक दरवर्षी या अभयारण्याला भेट देत असतात. सुमारे 12.155 चौरस किलोमीटरच्या परिसरात हे अभयारण्य वसले आहे. स्थानिक तसेच स्थलांतरित 147 प्रजातीचे पक्षी या ठिकाणी आहेत. यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित पक्षी आहेत. विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास आहे. या प्राण्यांच्या सध्याची स्थिती माहिती करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फ. विविध महत्वाच्या ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
सध्याची वातावरणातील परिस्थिती तसेच वाढता उकाडा पाहता, पाणथळ्या शेजारी वनविभागाने निवडलेले कर्मचारी या भागावर लक्ष ठेवून असणार आहेत.काही ठिकाणी ट्रॅक कॅमे-यांची देखील याकरिता मदत घेतली जाणार आहे.
एका संस्थेचे स्वयंसेवक व कर्नाळा अभयारण्यातील वनविभागाचे कर्मचारी या गणनेसाठी 24 तास प्राणी आणि पक्षांवर लक्ष ठेवून राहणार असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांनी दिली.
 
चौकट -
 कोविड काळात गणना नाही -
मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे बुद्धपौर्णिमेला प्राण्यांची गणना होऊ शकली नव्हती मात्र कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी वनविभागाने गणनेचे काम हाती घेतले आहे.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image