इसम बेपत्ता ...
इसम बेपत्ता ..
 
पनवेल दि २२ ( संजय कदम) : एक ४६ वर्षीय इसम राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कोठे तरी निघून गेल्याने तो  हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
                                             देविदास भिकाजी दवणे असे त्यांचे नाव असून बांधा सडपातळ, उंची ५फूट ६ इंच, केस काळे - पांढरे, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ असून डाव्या दंडावर देवीचे चित्र गोंदलेले आहे तसेचं अंगात जांभळ्या रंगाचा लाईनींग असलेला शर्ट आणि काळ्या रंगाची साधी  पॅण्ट घातलेली आहे. तरी  या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किवा महिला पोलीस नाईक  रेखा देसाई यांच्याशी संपर्क  साधावा.  
 
फोटो -  देविदास दवणे
Comments