कळंबोलीतील विकास कामे लवकरच मार्गी लागणार : आयुक्त गणेश देशमुख..
कळंबोलीतील विकास कामे लवकरच मार्गी लागणार : आयुक्त गणेश देशमुख
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी कळंबोली प्रभाग क्र.10 येथे नगरसेवक रवींद्र अनंत भगत यांच्या विनंतीला मान देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाहणी दौरा केला. त्यावेळेस नागरिकांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. त्यानंतर कळंबोलीतील विकास कामाबाबत पाहणी व त्याबाबतीला आढावा घेण्यात आला.
सेक्टर 1 ई येथील अवाढव्य नाला काही ठिकाणी बंद करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच नाल्यातील कचरा घाण हा पावसाळ्यापूर्वी  तात्काळ काढण्यात येतील असे आश्‍वासन देण्यात आले. तसेच कळंबोली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे मिनी स्टेडियम बनवण्यासाठी सिडको सोबत चर्चा करुन तात्काळ मिनी स्टेडियम बनवण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्याचबरोबर कळंबोली मधील होल्डिंग पाँड सुशोभीकरण करुन जनतेसाठी जॉगिंग ट्रॅक लवकरात लवकर तयार करण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे. कळंबोली कारमेल शाळेलगत असलेला नाला सुद्धा काही प्रमाणात बंदिस्त करण्यात येतील आणि नाला पावसाळ्यापूर्वी तात्काळ साफ करण्यात येतील. त्याच प्रमाणे कळंबोली सेक्टर 2 व 2ई मधील गार्डन सुशोभीकरण करुन त्याठिकाणी लहान मुलांच्या खेळण्यासाठी लागणारे साहित्य (डेव्हलपमेंट) करण्यात येईल. आजच्या आयुक्तांच्या दौर्‍यामध्ये अनेक विषय येत्या 1 ते 2 महिन्यात अति तात्काळ कामे पूर्ण होतील असे आश्‍वासन देण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक गोपाळ भगत, कळंबोली गाव महिला मंडळ, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, कळंबोली मधील नागरिक उपस्थित होते.

फोटो ः आयुक्त गणेश देशमुख यांनी केलेला कळंबोली वसाहत पाहणी दौरा
Comments