बेरोजगारांसाठी व्यवसाय व अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबिर,जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार..

जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार..


पनवेल : करोना काळात बऱ्याच नागरीकांच्या नोकऱ्या गेल्या व्यवसाय ठप्प झाले अशा परिस्थितीतही गेल्या पाच ते सहा महिन्यापासून स्वतःला सावरत प्रत्येक नागरीक पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत आपणही काहीतरी करायला पाहिजे या उद्देशाने जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक मे 2022 रोजी सकाळी दहा वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहपनवेल येथे व्यवसाय आणि अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

         या शिबिरामध्ये केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) च्या माध्यमातून जे कोर्सेस आहेत त्यांपैकी काही ठराविक कोर्सेसची विस्तृतपणे माहिती त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्फत मिळणार आहे. ते कोर्स झाल्यानंतर आपल्या व्यापाराला चालना देण्यासाठी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) आणि इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस (ICIB) च्या तज्ञ मंडळींकडून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या सबसिडी कर्जपुरवठा करते वेळी बँकांचे काही नियम असतात त्या नियमांविषयी आपल्याला सहकार्य करण्यासाठीबँक ऑफ इंडिया (BOI),बँक ऑफ बडोदा (BOB),रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक (RDC) चे अधिकारी उपस्थित राहणार आहे. जेणेकरून आपल्याला नव्याने सुरू करणारा व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होण्यास सहज सोपे होईल.

           सध्याच्या काळात नागरिकांमध्ये स्कीन आणि हेअर ट्रीटमेंट संदर्भात जागृतता  झाली आहे. सध्या या क्षेत्रात बरीच रोजगाराची संधी आहे.त्यासाठी त्याला अनुसरून जे विविध प्रकारचे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसची माहिती आणि सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी तंत्राज हेल्थ अँड ब्युटी वेलनेस क्लिनिक च्या डॉ.पल्लवी संदीप शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. कोणताही व्यवसायाचा अनुभव नसताना आज वर्षाला पन्नास लाख एक करोड पर्यंतचा व्यवसाय नेणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील  काही महिला उद्योजिकांचा सन्मान आणि त्यांचे मनोगत ऐकण्याची संधी या कार्यक्रमांमध्ये उपलब्ध होणार आहे.

 

कोट 

पनवेलमध्ये प्रथमच एका छत्राखाली केंद्र सरकारचे विविध कोर्सेस ची माहिती देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी येणार आहेत. तसेच कोर्स पूर्ण झाल्यावर आवश्यक ते परवाने काढण्यासाठी सहकार्य सुद्धा आम्ही देणार आहोत. कोर्स करून परवाने काढल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मार्फत ज्या विविध सबसिडी कर्ज पुरवठा वरती देण्यात येतात त्या मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विविध नॅशनलाईज बँकांचे प्रतिनिधी सुद्धा येणार आहेत. हे शिबिर युवकमहिला आणि तृतीयपंथी अशा प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी मोफत आयोजित करण्यात आलेले आहे.- 

प्रितम जनार्दन म्हात्रेअध्यक्ष जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था.

Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image