पनवेल तालुका पोलिस पथकाची कामगिरी
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील सोमटणे रेल्वे फाटकाजवळ एका टेम्पोत बेकायदेशीररित्या साठा केलेला 5 लाख 16 हजार 650 रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेतला आहे.
या संदर्भात खास बातमीदाराकडून वपोनि रवींद्र दौंडकर यांंना माहिती मिळाली की, एका टेम्पोमध्ये बेकायदेशीररित्या दोन इसम आरोग्यास अपायकारक असा प्रतिबंधीत अन्न पदार्थ व मानवी शरिरास घातक लोकजिवीतास धोका निर्माण करणार्या प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर, सहा.पो.नि.विवेक भोईर, सहा.पो.नि.धनश्री पवार, पो.ना.गणेश सांबरे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन त्या टेम्पोला ताब्यात घेतले आहे व त्यामध्ये 5 लाख 16 हजार 650 रुपयाचा गुटखा हस्तगत केला आहे. व त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 188, 272, 273, 328, 34 सह अन्न सुरक्षा मानदे अधिनियम 2006 मधील कलम 26 (2) (आय), 26 (2) (आयव्ही) व कलम 27 (2) (ई), 59 (2) प्रमाणे कारवाई केली आहे.