कळंबोलीतुन बेपत्ता झालेल्या ७३ वर्षीय वृद्धाबाबत माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन..
कळंबोलीतुन बेपत्ता झालेल्या 73 वर्षीय वृद्धाबाबत माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन  

पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः कळंबोलीच्या रोडपाली भागात राहणारे हिरालाल रामकृष्ण बावीस्कर (73) हे गत 24 एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याने कळंबोली पोलिसांनी त्यांच्या मिसींगचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  
बेपत्ता हिरालाल बावीस्कर हे कळंबोलीतील रोडपाली येथील जनार्दन पाटील चाळीत कुटुंबासह राहण्यास असून गत 24 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ते नेहमीप्रमाणे  फिरण्यासाठी घरातून बाहेर पडले होते, मात्र ते त्यानंतर घरी आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा पनवेल, तळोजा, बेलापुर, खिडूकपाडा, खारघर, कळंबोली या परिसरात तसेच रुग्णालयात तसेच नातेवाईक मित्र मंडळीकडे देखील त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांची काहीच माहिती मिळाली नाही.  त्यामुळे त्यांच्या मुलाने 27 एप्रिल रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात हिरालाल तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हिरालाल बाविस्कर बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. हिरालाल बाविस्कर यांचा वर्ण सावळा असुन त्यांची उंची 5 फुट 3 इंच इतकी आहे. त्यांच्या अंगात काळ्या रंगाची पॅन्ट व पिवळ्या रंगाचा फुल शर्ट असून या वर्णनाचा कुणी व्यक्ती आढळुन आल्यास त्याबाबतची माहिती कळंबोली पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
फोटो ः बेपत्ता हिरालाल बावीस्कर
Comments