आईसह मुलगी बेपत्ता...
आईसह मुलगी बेपत्ता
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कपडे शिलाई  करण्यासाठी बाहेर जातो असे सांगून आई व मुलगी घराबाहेर पडली. ते अद्याप घरी न परतल्याने त्या दोघी हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भिंगारी गाव येथील येथे राहणार्‍या सौ.दिपा शशिकिरण कांबळे (29) व त्यांची मुलगी कु.श्रावणी (11) या दोघी घराबाहेर पडल्या त्या अद्याप घरी परतल्या नाही आहेत. दिपा कांबळे या रंगाने सावळ्या, उंची 5 फुट 4 इंच, डोक्यावरील केस काळे, चेहरा उभट, नाक सरळ, उजव्या हातावर ओमचे चिन्ह गोंदलेले, तिला मराठी, हिंदी व कन्नड भाषा अवगत आहे. तिच्या पायात चप्पल असून अंगात ड्रेस घातला आहे. तर मुलगी कु.श्रावणी हिचा चेहरा गोल, डोक्याचे केस वाढलेले, हनुवटीवर तिळ, उंची 4 फूट तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. तसेच अंगावर फ्रॉक घातला आहे. या दोघींबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.हवा.एस.एम.फाळके यांच्याशी संपर्क साधावा.


फोटो ः बेपत्ता दिपा व श्रावणी
Comments